देशमुखवस्ती आदर्श शाळेत जागतिक हिवताप दिन साजरा

0 80
Deshmukhvasti Adarsh School celebrates World Malaria Day
 श्रीगोंदा – तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील  जि. प . देशमुखवस्ती आदर्श शाळेत जागतिक हिवताप दिन (World Malaria Day) / जंतनाशक मोहिम निमित्त प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र मढेवडगाव यांचे वतीने मार्गदर्शन डॉ. अंजली निवडंगे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक  मार्गदर्शन  केले.
तसेच आहार वाटपानंतर  जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. डॉ निवडंगे म्हणाल्या की आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. टायर, न वापरातील वस्तू यात पाणी साठू देऊ नये. त्यामुळे डास होतात त्यामुळे आपण आजारी पडतो. तसेच हात न धुता खाणे, जास्त गोड खाणे यामुळे पोटात जंत होतात. तसेच अस्वच्छ खाण्यामुळे अॅनिमिया होतो. सर्वांनी काळजी घ्यावी. असं मार्गदर्शन त्यांनी केला.

 

Related Posts
1 of 2,420

यावेळी आशासेविका क्षकुंतला फरकांडे, अंगणवाडी सेविका वैशाली देशमुख , मुख्याध्यापक रामदास ठाकर, रामचंद्र भगत उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: