
नगर : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सारसनगर कानडे मळा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. नितीन किसन लाड, (रा. सारसनगर, कानडेमळा, नगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन तसेच हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य असणारा आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांना नितीन लाड हा हद्दपार असून तो सध्या निलक्रांती चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली.
कर्जतमध्ये काही जागांवर दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती….
त्यानुसार त्यांनी तत्काळ आरोपी ताब्यात घेण्याचा सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप घोडके, दिनेश मोरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, योगेश सातपुते यांनी निलक्रांती चौकात सापळारचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या शहरामध्ये वास्तव्य करीत असल्याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.