खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0 249

अहमदनगर  –  महालक्ष्मी हिवरे ता. नेवासा येथील सर्जेराव गणपत गायके यांची पत्नी मयत ज्योती गायके याचा गळा दाबून खून (Murder)  करण्यात आला व आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून सदरील आरोपींवर 302 व 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गायके कुटुंबीयांनी निवेदन देण्यात आले.  यावेळी पती सर्जेराव गायके समवेत गणपत गायके उपस्थित होते. (Demand to file a case against the accused who committed the accident by committing murder)

मयत ज्योती सर्जेराव गायके यांचा सदर आरोपींनी अपघाताचा बनाव केला व पोस्टमार्टम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांचे अहवाल आल्यानंतर सदरील घटना लक्षात आली असून सदर मयत ज्योती गायके हिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये आले आहे तसेच या खुनाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा तसेच या प्रकरणातील आरोपी यांच्यावर 302 व 301 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तसेच या प्रकरणातील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासात  दिरंगाईबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच रत्नपारखी यांनी मयत ज्योती सर्जेराव गायके यांच्या खून प्रकरणी तपास जाणीवपूर्वक दिरंगाई का केली व याबद्दल त्याची सखोल चौकशी करावी व तपास करण्यास अपयशी ठरलेल्या पाथर्डी पोलिसांकडून सदर तपास काढून घेऊन सीआयडीकडे वर्ग करावा तसेच पाथर्डी पोलिसांनी दिलेल्या आरोपी पोपट घोरपडे, आप्पासाहेब वांडेकर यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,487
सदर घटनेला 2 वर्षे 6 महिने होऊन देखील कुटुंबीयांना न्याय मिळालेला नसून  आमचे मेहुणे घोरपडे यांनी आम्हाला मारण्याची धमकी देत आहे व आरोपींना सहकार्य करत आहे तरी आमच्या कुटुंबीयांची अन्न व पाणी यापासून आमची उपासमार होत आहे त्यामुळे आम्हाला योग्य न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.(Demand to file a case against the accused who committed the accident by committing murder)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: