
श्रीगोंदा :- 15 एप्रिल 2022 रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात घडलेल्या अभिमन्यू साळवे व गौतम साळवे या मागासवर्गीय तरुणाच्या प्राणघातक हल्ला प्रकरणात स्थानिक पोलिस प्रशासनाचे दोन्ही पोलीस निरीक्षक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
माध्यमांनी या प्रकरणाबाबत माहिती विचारली असता, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ नमूद प्रकरण श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात घडले असल्याने.. ती त्यांची जिम्मेदारी आहे.. तर, श्रीगोंदा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना याबाबत माहिती विचारले असता, सदरील प्रकार बेलवंडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील असल्याने त्यांची जबाबदारी असल्याचे सांगत आहेत.मात्र, प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी असलेले गौतम आणि अभिमन्यू साळवे यांना दोन्हीही पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून घेण्यापासून वंचित ठेवलेले आहे.विशेषतः अभिमन्यूला गंभीर दुखापत झालेली आहे. त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे आज श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात केलेल्या तपासणीत समोर आले आहे.
गुन्हा दाखल करून घेणे. दूरच…! श्रीगोंदा पोलीस स्टेशन कडून बेलवंडी पोलीस स्टेशन.. अनं बेलवंडी पो स्टे कडून श्रीगोंद्याकडे…? या येण्या जाण्यातच पीडित अभिमन्यूची वैद्यकीय तपासणीस दिरंगाई झाली…दरम्यान चोवीस तासांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर त्याची आज 11: 00 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला काल पासून होत असलेल्या असह्य वेदना त्याने साध्या वेदनाशामक गोळी खाऊन गिळल्या..! विना उपचार पोलीस स्टेशन मध्ये त्याला डांबून ठेवल्याने, सदरील प्रकार अमानवीय असल्याचे समोर येत आहे.
पोलीस प्रशासनाने चोरीचा प्रकार असल्याचे दाखवत गौतम आणि अभिमन्यू साळवे यांच्यावर भादवि कलम 379 व 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत आणि दोघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या बाबतची माहिती ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांना नुकतीच समजली.. यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासन व कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली.आणि पुढील सनदशीर कारवाईच्या सूचना दिल्याचे समजते आहे.मागासवर्गीय तरुणांवर उलट गुन्हे दाखल करत, त्यांनाच मारहाण करून गुन्हा दाखल करण्यापासून वंचित करणारे बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमुख पीआय नंदकुमार दुधाळ यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी दीपक भाई केदार यांनी केली आहे.तसेच याप्रकरणी सखोल तपास करून मागासवर्गीय समाजाच्या गौतम आणि अभिमन्यूचे गुन्हे दाखल करून घ्यावेत.
सदरील प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असून, जातीय द्वेषातून घडलेला आहे. असे मत काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, ऑल इंडिया पॅंथर सेना अहमदनगर, मातंग युवक संघटना श्रीगोंदा, बहुजन समाज पार्टी, अहमदनगर यांचेसह विविध पुरोगामी व आंबेडकरवादी संघटना नंदकुमार दुधाळ व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणाली व नमूद प्रकरणातील भूमिकेविरोधात आंदोलन करणार आहेत..अशी माहिती मिळाली आहे.