एक लाखाच्या लाचेची मागणी, पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई

0 491
Demand for Rs one lakh bribe, ACB action against police inspector

उस्मानाबाद –  उस्मानाबाद अँटी करप्शन विभागा (Anti Corruption Department) ने कारवाई करत येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (Police Inspector )गणेश मुंढे (Ganesh Mundhe) आणि पोलीस पाटील यांच्यावर निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई केली आहे. ज्या पोलीस ठाण्यात मुंडे कार्यरत होते तिथेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Demand for Rs one lakh bribe, ACB action against police inspector)

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे 22 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.आरोपी यांची लाच मागणी पडताळणी केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान गणेश मुंडे व पोलीस पाटील हे दोघेही फरार आहेत.

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Related Posts
1 of 2,107

सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद .विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. (Demand for Rs one lakh bribe, ACB action against police inspector)

शेतीत दुसरा वाटेकरी नको म्हणून भावानेच केला सख्ख्या भावाचा खून

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: