छावणी परिषदेच्या पथकर नाका घेतलेल्या ठेकेदारावर फसवणूक केल्याच्या निषेधार्थ कारवाई करण्याची मागणी – मतीन सय्यद

0 69

अहमदनगर-   छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक नुकसान केल्याचया निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शन करून मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, राज ठाकूर, महेंद्र उपाध्य, मधुर बागायत, मझर तांबटकर, शानवाज काजी, पाप्या शेख, लियाकत शेख, पै नईम शेख आदी उपस्थित होते.    (Demand for action against the contractor who took the Pathkar Naka of the cantonment council for cheating)

छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) सन 2020-

2021 एन.एच.इंजिनिअरिंग कंपनीने पथकर नाका घेतया वेळेस टेंडरच्या नियमा वेळेस जे कागदपत्र हवे होते त्यांनी पूर्तता न केल्यास त्या अनुषंगाने टेंडर        घेत्यावेळेस बॅक गॅरंटी व बँक साँलवंन्सी ४ करोड ५० लाख रुपये ची देण्यात आली आहेत किंवा नाही याचा जाहीर खुलासा करावा व बँक गॅरंटी दिली नसताना संबंधित ठेकेदारास ५ ते ६ महिने का चालवण्यास देण्यात आले नियम असे आहे की १५ दिवसांची मुदत जास्तीत जास्त कुठल्याही ठेकेदारास बँक गॅरंटी देण्यात येते पण त्याचा उल्लंघन करून ६ महिनेपर्यंत त्यांना नाका चालवण्यास का परवानगी देण्यात आली पथकर नाका संदर्भात फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे ज्या अधिकाऱ्यांकडे सदरील कामाची देखरेख तसेच पैसे वसूल करण्याचे टेबल आहे.

त्याने किंवा छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहमतीने परवानगी दिल्याचेप्रथम दर्शनी दिसून येत असल्यामुळे सर्वांची चौकशी करण्यात यावी व यांचा सखोल स्पष्टीकरण देण्यात यावे यामध्ये भारत सरकारचा मोठा नुकसान झालेला आहे तसेच टेंडर देण्याचे ठरवल्यास ताबा घेण्याची मुदत 15 दिवसाच्या आत असते तरीही टेंडर ताबा झाल्यानंतर 60 ते 65 दिवसानंतर याचा ताबा देण्यात आला टेंडर कायद्यानुसार 15 दिवसात जर ताबा घेतला नाही तर सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येते व नवीन टेंडर प्रक्रियेला सुरुवात करण्यात येते तसे न करता पण संबंधित कंपनीला दोन महिने मुदत का वाढवून देण्यात आली याची चौकशी देखील करण्यात यावी तसेच टेडर दिल्यानंतर त्यांना १ लाख ३० हजार रुपये रोजचे कलेक्शन आहेत व होते.

Related Posts
1 of 1,603

अशरफ गनी यांना भारताने आश्रय दिला पाहिजे – भाजपा खासदार

 त्यांना दोन महिने मुदतवाढ दिल्यामुळे कॅन्टोन्मेंटचा एक कोटी रुपयाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे कॅंटोनमेंट मधील काम करणाऱ्या कामगारांची आत्तापर्यंत चार महिन्याचे पगार देखील देण्यात आलेले नाही तसेच पथकर नाक्यावर मॅनेजर व कर्मचारी यांचे कामावर रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत पगार करण्यात आलेला नसतानाही त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट का देण्यात आले आहे संविधानाच्या कायद्यानुसार कामगाराला जर पगार वेतन न दिल्यास प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर असल्याने याचा संदर्भ आपल्याशी निगडीत आहे तरी त्यांना कोणत्या कायद्याच्या आधारे सिक्युरिटी डिपॉजिट विना हरकत कोणतीही चौकशी न करता का देण्यात आले याची आपल्या मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावा व कामगाराचा शोषण केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यामुळे त्यांच्या संपूर्ण पगार संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करून दंड वसूल करून पथकर नाक्यावर काम करणाऱ्या गरीब होतकरू कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा जर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पथकर ना क्याचा भ्रष्टाचाराची चौकशी त्वरित झाली नाही तर कर्मचारी व त्यांच्या परिवारासह प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ पुणे येथे कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.(Demand for action against the contractor who took the Pathkar Naka of the cantonment council for cheating)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: