
दोन्ही संघांनी आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यापैकी प्रत्येकी ६ लढतीत विजय मिळवलाय. पंजाबचा संघ १२ गुण आणि प्लस ०.०२३ नेट रनरेटसह गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे दिल्लीच्या संघाने १२ गुण आणि प्लस ०.२१० गुणांसह गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ २९ वेळा भिडले आहेत. त्यापैकी १५ वेळा दिल्लीने तर १४ वेळा पंजाबने बाजी मारली आहे.
डीवाय पाटील मैदानावरील पिच आता धीमे झाले आहे. टॉस जिंकणाऱ्या संघाने चांगली धावसंख्या केली तर विजय मिळवता येतो. दुसऱ्या डावात खेळपट्टी स्लो होते, त्यामुळे धावा करण्यात अडचणी येतात. आज देखील टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पंजाब किंग्ज- जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयांक अग्रवाल, जितेश शर्मा, लियाम लिविंगस्टोन, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह.
दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्जे.