Deglur Assembly bypolls result, मतमोजणी सुरु , काँग्रेस ने घेतली आघाडी

0 240
नांदेड –  देशात आज लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Assembly) साठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मत मोजणी (Counting of votes in by-elections) होत आहे . राज्यातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील  देगलूर विधानसभेच्या (Deglaur Assembly)  पोटनिवडणुकीची मत मोजणी सुरु आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहे. (Deglur Assembly bypolls result, counting begins, Congress takes the lead)
आता पर्यंत 30 पैकी 3 फेऱ्या झाले असून या तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10  हजार 712  मते मिळाली असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमदेवार सुभाष साबणे यांना 7 हजार 448 मते मिळाले आहे. पहिल्या तीन फेरीचा विचार केला ते आता पर्यंत या जागेवर काँग्रेसने 3 हजार 264 मतांनी आघाडी घेतली आहे.
Related Posts
1 of 1,481

दुसरी फेरी

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर – 7295 मते

भाजपचे सुभाष साबणे – 5001 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले – 769 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर – 4216 मते

भाजपचे सुभाष साबणे – 2592 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले – 320 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर – 1624 मतांनी आघाडीवर

या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता.

नगर अर्बन बँक निवडणुकसाठी…., 94 उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य लढत जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि सुभाष साबणे (Subhash Sabane) यांच्यात होत आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. (Deglur Assembly bypolls result, counting begins, Congress takes the lead)

हे पण पहा – मोक्का प्रकरणातील आरोपी पठारे मुक्त | अजय पठारेला जामीन मंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: