Ahmenagar Bank :-जिल्हा बँकेचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी…. गद्दारी केली त्याला येणाऱ्या काळात झटका….
गद्दारी केली त्याला झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला आहे

Ahmenagar Bank :- अहमदनगर : येणाऱ्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्याला झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी दिला आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघात दहा हजार मुलांना सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, चौकशीत राऊतला विशेषाधिकार उल्लंघन केल्याबद्दल दोषी.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांचा पराभव झाला. 14 मते राष्ट्रवादीचे असताना सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक पडला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली हार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चांगली जिव्हरी लागली आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पवार म्हणाले की, येणाऱ्या काळात गद्दारी करणाऱ्या अवलादी आपल्याकडे नकोत. दिवसा आमच्यासोबत व मतदानाला त्यांच्यासोबत असे अवलादी आपल्याकडे नकोत. येणाऱ्या काळात त्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही पावर म्हणाले.
सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.
पवार (Ajit Pawar) म्हणाले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा नुसता झाले आहे त्यामध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यावर अक्षरशा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कांद्याला पाचशे रुपये भाव द्यावा म्हणून आम्ही अधिवेशनामध्ये आंदोलन केले. आवाजही उठवला मात्र सरकारने वीस रुपये भाव दिला आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र जाहिराती एक हजार कोटी रुपये सरकारने खर्च केला आहे. तुमचे सरकार सत्तेवर कसा आले हे सर्व जनतेने पाहिला आहे. जाहिरातीमध्ये फक्त दाखवत आहे. सरकार गतिमान मात्र जनतेची काम होत नसल्याचा आरोपही अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.