वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात हरिण मृत्युमुखी ; तपास सुरु

0 156
Deer killed in wildlife attack; The investigation began

अकोले : – कुत्र्यांच्या अथवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एक हरिण मृत्युमुखी (Deer)पडल्याची घटना घडली. अकोले  येथील शाहूनगर परिसरात एका हरिणाचा मृतदेह सकाळी आढळून आला. त्याचा डोक्याचा भाग वगळता शरीराच्या अन्य भागावरील मांस फस्त केले होते.

प्राथमिक अंदाजानुसार कुत्र्यांच्या हल्ल्यात भरकटलेल्या हरिणाचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र बिबट्या, तरस या सारख्या वन्य प्राण्याने हरिणावर हल्ला करून त्याची शिकार केल्यानंतर कुत्र्यांनी ते मृत हरीण शाहूनगर परिसरात ओढून आणले असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. हरणाचे डोक्याकडील भाग सोडता सर्व भाग फस्त केल्याचे दिसून आले. त्यानंतर वन विभागाने या मृत हरिणाचे दहन केले.

Related Posts
1 of 2,326

याबाबत वन अधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात लगतच्या धुमाळवाडी, ढगेवाडी येथे हरणाचा वावर असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. अधिक तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. बिबट्याचे कातडी विकणारी टोळी आळेफाटा येथे पकडले असून त्यातील आरोपी अकोले तालुक्यातील असल्याचे समजते. या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाने सतर्क राहावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. असे असले तरी कोणत्याही नागरिकांना वन्यजीवाची तस्करी अथवा शिकार करतानाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्यांनी वन विभागाशी तातडीने संपर्क साधावा म्हणजे वन्यजीवांची हानी टाळता येईल, असे आवाहन वन अधिकारी प्रदीप कदम यांनी केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: