DNA मराठी

दीपक पांडे पुन्हा चर्चेत; जाता जाता घेतला आणखी एक मोठा निर्णय

0 367

नाशिक – नुकताच राज्यात चर्चेत असलेल्या नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दीपक पांडे यांची नुकतीच नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरुन बदली झाली आहे.

आयुक्त पांडे हे विविध कारणामुळे सतत चर्चेत होते. त्यांच्या कारभाराची चर्चा राज्यभरातच होत होती. खासकरुन त्यांचा लेटरबॉम्ब आणि हेल्मेट सक्ती यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, जाता जाता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेऊन सुखद दिलासा दिला आहे.

नाशिकमध्ये दुचाकीवरील दोघांना हेल्मेट सक्तीचा निर्णय पांडे यांनी घेतला. तसेच, हेल्मेटशिवाय दुचाकी चालकांना पेट्रोल देऊ नये. तरीही दिल्यास पंप चालकांवर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला होता. या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.

अखेर नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी संप पुकारला. त्यामुळे ही बाब राज्यभरात चर्चिली गेली. त्यानंतरही पांडे यांनी भूमिका कायम ठेवली आणि नाशकातील काही पंपचालकांना थेट कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. विशेष म्हणजे, या नोटिसा थेट परवाना रद्द का करु नये, अशा स्वरुपाच्या होत्या.

Related Posts
1 of 2,530

यामुळे पंपचालकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण होते. अखेर जाता जाता पांडे यांनी पंपचालकांना दिलासा दिला आहे. तशी माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे भूषण भोसले यांनी दिली आहे.

पांडे यांनी पालिजा पेट्रोलियम, खालसा पेट्रोलियम आणि एन एल गांधी पेट्रोलियम या 3 पंप चालकांना लायसन्स रद्द करण्याची करणे दाखवा नोटीस बजावली होती. असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत विनंती अर्ज केला होता. त्याची दखल घेत पाण्डेय यांनी त्यांच्या कारणे दाखवा नोटिस मागे घेतल्या तसेच रद्दही केल्या आहेत. सर्व पंपचालकांची एकजूटीमुळेच हे घडल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: