आ. बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय – संदीप नागवडे

0 121
श्रीगोंदा :-   दरवर्षी ९ सप्टेंबरला मोठ्या जल्लोषात साजरा होणारा आमदार पाचपुते (Babanrao Pachpute) यांचा वाढदिवस या वर्षी कोरोना मुळे साजरा न करण्याचा निर्णय पाचपुते यांनी घेतल्याचे श्रीगोंदा भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे (Sandeep Nagwade) यांनी सांगितले.
यावर्षी आ.पाचपुते यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव आण्णा पाचपुते,तसेच तुकारामजी दरेकर सर, संतोषजी खेतमाळीस, सतीश शेठ पोखर्णा, एम.टी. दरेकर सर, ज्ञानेश्वर राऊत, किसन भाऊ वाघमारे , पै.मच्छीन्द्र डोंगरे , संदिप पवार, बळीराम बोडखे , पत्रकार मच्छिंद्र जठार ,  बेबीताई मगर, शोभाताई धस, देवराम कासार, अल्ताफ पटेल यांसारखे अनेक जवळचे सहकारी गेल्याने हे वर्ष अतिशय वेदनादायी गेले आहे.त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याची मानसिकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळामध्ये प्रत्येकाला ऑक्सिजन चे महत्व कळाले आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी बुके,शाल,श्रीफळ यावर खर्च करण्यापेक्षा एक झाड लावून त्यासोबत चा सेल्फी ९७६६८०७७३३ या नंबरवर पाठवावा, त्याच माझ्यासाठी खऱ्याखुऱ्या शुभेच्छा व जे कोरोनाकाळात गेले आहेत त्यांच्यासाठी हि श्रद्धांजली असेल, प्रत्यक्ष भेटायला कोणीही न येता  प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्या व कोरोना नियमांचे पालन करा, पुढचा वाढदिवस आपण कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे साजरा करू असे आमदार पाचपुते यांनी सांगितल्याचे संदीप नागवडे म्हणाले.
Related Posts
1 of 1,518
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: