कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याच्या नादात मुलीचा नवव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

0 255

 गाझियाबाद – आपल्या देशात लहान मुले हे आपल्या पाळीव प्राणीला किती प्रेम करतात हे काही सांगण्याची  गरज नाही. जवळपास बहुतेक लोक आप आपल्या घरात वेगवेगळ्या ब्रीडच्या मांजरी आणि कुत्रे पाळतात . काही जणांचं तर त्यांच्या पाळीव प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की ते घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना जपतात, त्यांची काळजी घेतात. बऱ्याचदा त्या पाळीव प्राण्यांचा वाचवण्यासाठी त्यांचे मालक जीवावर देखील खेळून जातात. अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून समोर आली आहे. (Death to the ninth floor of the girl saving a dog)

कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका मुलीला तिचा जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दुर्दैवाने कुत्र्याच्या पिलाचा देखील मृत्यू झाला आहे. बाल्कनीत अडकलेल्या एका पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या मुलीचा ९व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गाझियाबाद (Ghaziabad) मधील गौर होम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये दुपारी घडली.

एंट्रीवरील चुकीचा गाणं लागल्याने वधूला आला राग … , पहा हा व्हायरल व्हिडिओ

Related Posts
1 of 1,481

ज्योत्सना ही १२ वर्षीय मुलगी तिच्या पाळीव कुत्र्यासह गॅलरीमध्ये खेळत होती. यावेळी कुत्रा गॅलरीतील जाळीत अडकला. ज्योत्सना कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान तिचा तोल गेला आणि ती कुत्र्यासह ९व्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडली. यावेळी मुलीची आई घरातच होती. मुलीचा पडल्याच्या आवाज आल्यानंतर तिने बाहेर धाव घेतली. तिने बाल्कनीतून खाली पाहिले असता मुलगी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने तातडीने मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.(Death to the ninth floor of the girl saving a dog)

हे पण पहा – तहसीलदार यांच्या अडचणीत वाढ, तहसीलदार यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा – महसूल व तलाठी संघटना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: