DNA मराठी

अपघातात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू….

वांबोरी फाट्याजवळ त्यांच्या कारला ट्रक क्रमांक एम एच 46 बीएम 2859 ने धडक दिल्याने समोरील दोघांचा जागीच मृत्यू झाला

0 10

Zilla Parishad Ahmednagar – राहुरी : वांबोरी फाट्यावर कार व ट्रकच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी असून त्याला नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.

नगर जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad ) कर्मचारी नाशिक येथे शासकीय कामासाठी गेले होते. नाशिकहून शासकीय काम आटोपून आपली कार एम एच 16 सीव्ही 1066 या गाडीतून नगरकडे येत असताना राहुरी च्या पुढे वांबोरी फाट्याजवळ त्यांच्या कारला ट्रक क्रमांक एम एच 46 बीएम 2859 ने धडक दिल्याने समोरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री बारा वाजल्याच्या नंतर घडली. घटना घडल्यानंतर त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दोघे जागीच मृत झाले होते.

वाळू डेपो विरोधात आमदार शंकरराव गडाख ग्रामस्थांसह मैदानात…..

Related Posts
1 of 2,492

विनायक कातोरे वरिष्ठ सहायक महिला बालकल्याण विभाग, अशोक व्यवहारे कक्ष अधिकारी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर असे मृतांचे नावे आहेत. संतोष लंके हे जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या विभागाचे कर्मचारी हे रोस्टर तपासणी साठी नाशिक येथे गेले होते. नगर कडे येत असताना त्यांना वांबोरी फाट्यावर अपघात झाला. कातोरे हे कामरगाव तालुका नगर येथील रहिवासी आहेत तर व्यवहारे हे वांबोरी येथील आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: