काष्ठी मध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू; गुन्हा दाखल

0 182
man's death due to mob beating; Crime filed against five persons ..!
श्रीगोंदा :-  उन्हाळ्याचे दिवस शाळेला दुपार नंतर सुट्टी असल्याने शाळेतून आल्यानंतर  मित्राबरोबर पोहायला गेलेल्या केतन  शशिकांत लोंढे (वय वर्षे १४) याचा विहित बुडून दुदैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते. चुलते सोमनाथ गोविंद लोंढे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करित आहे.
सविस्तर माहिती अशी कि श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ( गणेशा ) राहणारा केतन लोंढे हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळा सुटल्या नंतर दि. ६ एप्रिल दुपारी एक वाजता सर्व आठ ते दहा मुले येथील शेतकरी राहुल नलवडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेले. केतन हा नुकताच पोहायला शिकला होता दोन तास पोहून झाल्यानंतर केतन याने सर्वाची नजर चुकवून विहित गेला. पण त्याचवेळी सर्व मुले बाहेर आली असताना तेथे जबाबदार असणाऱ्या व्यक्तीनी केतन कुठे दिसेना म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरु झाला.
तो कुठेच दिसेना म्हणून वेळ न घालविता येथील अमोल मोटे,जीवन कापडे,अमोल देशमुख,गोटु गवते, बंडू चोभे यांनी विहिरीत उड्या मारुण शोध घेतला परंतु नुकतेच घोडचे पाणी आवर्तन येवून गेल्याने येथील विहिरीची पाणी पातळी वाढल्यामुळे जमीन लेवलला पाणी असल्याने येथील तरुणांना पाण्यात खोलपर्यत जाता येईना त्यावेळी अनेकांची  खात्री झाली अनिकेत बुडाला त्यावेळी येथे वीजेचा लंपडाव  असल्याने लाईट नाही. अधिकाऱ्यांना विनंती करुण लाईट आल्यानंतर विहिरीवर इंजिन सह पाच विद्युत पंप जोडून पाणी उपसले तेव्हा सायंकाळी  चार वाजता केतनचा मृतदेह पाण्यात तळाला सापडला तोपर्यंत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पत्रकार दत्ता पाचपुते यांनी खबर दिल्यानंतर पोलिस घटस्थळी दाखल होवून विहिरीतून मृतदेह बाहेर काढून  पंचनामा करुण सदर मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी सहा वाजता पाठवून रात्री उशीला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी केतन हा इयत्ता नववी शाळेत शिक्षण घेत होता शाळेत  हुशार असल्यामुळे लाडक्या बबलुचा मृतदेह पाहून आईवडीलांनी हांबरडा फोडला त्यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.
Related Posts
1 of 2,190
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: