डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे भिक्षुकाचा मृत्यू ?

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्या एकूण चार भिक्षेकरी गृह आहेत त्यातील एका भिक्षेकरी गृहातील भिक्षुकाचा मृत्यू डॉक्टरांच्या (doctor) हलगर्जी पणामुळे झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत असून संबंधित डॉक्टर याच्यावर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात घायपतवाडी,चिंभला विसापूर तसेच पिंपळगाव पिसा या ठिकाणी सरकारी भिक्षेकरी गृह आहेत या ठिकाणी भिक्षुक यांची कोणत्याही प्रकारची योग्य ती काळजी घेत नसल्याच्या अनेक तक्रारीच्या अनेक तक्रारी ऐकण्यास मिळत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील राजकुमार रामश्री गुप्ता (वय 70) या नावाचा भिक्षुक एक महिन्यापासून आजारी पडला होता . त्यावर उपचार करण्यासाठी भिक्षेकरी गृहातील डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत तेथील डॉक्टर के एस देवरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांना त्या भिक्षुकाचा मृत्यूचे कारण सांगू शकले नाही त्यामुळे त्यांनी ह्रदयविकार यांच्या झटक्याने अथवा उस्माघात मृत्यू झाला असल्याचे भाकीत त्यांनी केले मात्र काही कर्मचारी आणि भिक्षुक यांनी सांगितले की आजारी पडल्यास डॉक्टर लवकर उपलब्ध होत नाहीत मात्र जास्त नश्या केल्याने त्यांचा मेंदू काम करत नाही असे डॉक्टर देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
मयत राजकुमार गुप्ता यांचा मृतदेह चारचाकी टमटम क्र एम एच 16 ये वाय4701 मधून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असता त्याचसोबत वरिष्ठ काळजी वाहू मोहन वाणी, जमादार,डॉक्टर देवरे यांच्यासह मदतीसाठी दोन भिक्षुक आणले होते त्याचबरोबर स्थानिक बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोहेका पठारे सचिन आदी उपस्थित होते .
कार्यालयीन अधीक्षक असतात कुठे ?
श्रीगोंदा तालुक्यातील भिक्षेकरी गृहासाठी अधीक्षक के एस गांगरडे यांची नेमणूक आहे मात्र त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभारी चार्ज असल्याने ते तिकडे असतील अशी माहिती जमादार यांनी सांगितले मात्र याबाबत सविस्तर माहिती घेतली असता ते दोन्ही ठिकाणी नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यामुळे भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक नेमके असतात तरी कुठे याचा शोध गृह विभागाचे घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गृहविभागाला माहिती देण्यास विलंब का ?
श्रीगोंदा तालुक्यातील चारही भिक्षेकरी गृहात कोणत्याही प्रकारची घटना अथवा आक्षेपार्ह घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ गृहविभागाला देण्याची गरज असते मात्र जामदार यांनी आपले नाव न सांगता गृहविभागातील कार्यलयात कोणीही फोन उचलत नाही त्यामळे ते नायब तहसीलदार यांना संपर्क केला असता त्यांनी कार्यलयातच फोन करा असे सांगितले परिणामी गृहविभागाला सादर घटनेबाबत माहिती मिळण्यास उशीर झाला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
मृत्यूचे कारण काय ?
भिक्षेकरी गृहातील राजकुमार रामश्री गुप्ता यांनी आजारी असल्यामुळे कालपासून जेवण पाणी सोडले होते त्यांना सरकारी रुग्णालयात हलविण्यात येणार होते त्याअगोदर त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती भिक्षेकरी गृहाचे डॉक्टर देवरे यांनी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर आकाश कोकरे यांना दिल्याची माहिती डॉ कोकरे यांनी दिली आहे यावरून डॉक्टर देवरे यांच्या हलगर्जीपणा मुळे त्या भिक्षुकाचा मृत्यू झाला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही