DNA मराठी

हौदात पडून एका तरूणाचा मृत्यू

हौदात पडून एका तरूणाचा मृत्यू, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 125

हौदात पडून एका तरूणाचा मृत्य
अहमदनगर ः केडगाव औद्योगिक वसाहतीमधील बोथरा गेट जवळील पाण्याच्या हौदात पडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान त्या मृत २२ वर्षीय तरूणाची ओळख पटलेली नाही. गुरूवारी (ता. १८) सकाळी सव्वा अकरा वाजता ही घटना उघडकीस आली.

मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा शेवगाव पाथर्डी बंद
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केडगाव औद्योगिक वसाहतीमधील बोथरा गेट जवळील एका पाण्याच्या हौदात पडून एक २२ वर्षीय तरूण बेशुध्द झाल्याने त्याला येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्याची ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे २२ वर्ष, नाव पत्ता माहित नाही, अंगाने- सडपातळ, वर्ण- काळा सावळा, चेहरा उभट, दाढी मिशा वाढलेली, उंची अंदाजे १६९ सेमी, उजव्या हाताच्या कांबीवर गोंदलेले, छातीवर तीळ, नाका तोंडातून फेस आलेला आहे. या वर्णनाच्या तरूणाविषयी माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts
1 of 2,494
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: