बेलवंडी येथे घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन..,हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा हा प्रयत्न – घनश्याम शेलार

0 288
Darshan of Hindu-Muslim unity took place at Belwandi .., this attempt to create Hindu-Muslim riots - Ghanshyam Shelar
श्रीगोंदा :- एकीकडे संपूर्ण राज्यात मशिदीवरील भोंग्याचे राजकारण तापले असताना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील गौसिया जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजाने सर्व जातीधर्माच्या व्यक्तींसाठी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. सर्वधर्मीयांसाठी यावेळी शिरखुरमा, भजे, जिलेबी, समोसे यांची खास मेजवानी करण्यात आली होती.यातूनच हिंदू मुस्लिम समाजाचे एकतेचे दर्शन संपूर्ण तालुक्यात घडले.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, प्रतिभाताई पाचपुते,पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नागवडे कारखान्याचे संचालक सावता हिरवे, उपसरपंच उत्तम डाके, संग्राम पवार,व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे, समता पतसंस्थेचे चेअरमन सुनील ढवळे, युवराज पवार, अश्रुद्दीन हवालदार, सुभाष काळाने, दिनेश इथापे,संजय डाके, संदीप तरटे,यांच्यासह अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.ईद निमित्त गौसिया जामा मस्जिद च्या बांधकामासाठी देणगी म्हणून नागवडे करखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एक लाख रुपये, माजी आमदार राहुल जगताप यांनी एकावन्न हजार रु. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी एकावन्न हजार रु. तर समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अश्रुद्दीन हवालदार यांनी एक लाख रु. देणगी दिली. माजी आमदार राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते ट्रस्ट चे अध्यक्ष सलीम शेख यांच्याकडे ही देणगी सुपूर्त केली.
ईद निमित्त शुभेच्छा देताना घनश्याम अण्णा शेलार म्हणाले की मुस्लिम बांधवांनी एक महिन्याचा कठोर उपवास करून देशामध्ये शांतता नांदावी अशी प्रार्थना अल्लाह कडे केलेली आहे.दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर आज रमजान ईद मोठ्या आनंदाने साजरी होत आहे. परंतु काही लोकांना आताच भोंगा आठवला आहे.
मुस्लिम समाजाच्या नमाज आणि अजाण पठण चा काही लोकांना त्रास होयला लागला आहे.खर तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी चा हा प्रयत्न आहे.यातून हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका घनश्याम शेलार यांनी यावेळी केली.मुस्लिम समाजाने सामाजिक ऐक्य ठेवण्यासाठी या इफ्तार पार्टी च आयोजन केले त्याबद्दल मुस्लिम बांधवांचे आमदार राहुल जगताप यांनी आभार मानले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले की, कोणी कितीही चिथावणीखोर भाष्य केले तरी मुस्लिम बांधवांनी संयम ठेऊन सहकार्य ची भावना ठेवली त्यामुळे सामाजिक सलोखा कायम राहिला आहे. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचे अण्णासाहेब शेलार यांनी कौतुक केले.
या इफ्तार पार्टीसाठी ट्रस्ट चे अध्यक्ष सलीम शेख,बुढन शेख, कादरभाई शेख,बबन हवालदार, फत्तुभाई शेख,जमीर हवालदार, रियाज हवालदार,अय्युब शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Related Posts
1 of 2,452
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: