महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यात डेंग्यूच्या नवीन व्हेरियंटचा धोका

0 237

नवी मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा (Second Way) प्रभाव कमी झाला आहे. माञ येणाऱ्या काही महिन्यात कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे. माञ राज्यात सध्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटनं नाही तर डेंग्यूच्या (Dengue) एका नव्या व्हेरियंटनं (Variant) समोर आला आहे. या व्हेरियंटबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

 या आजाराची लक्षणं काय

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट काहीशी आटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा धोका वाढत आहे. डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर आला आहे. 

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशासह 11 राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेत. एरवीही पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. मात्र यावेळी प्रमाण जास्त असल्यामुळे चिंता वाढलीये.

काय आहेत डेंग्यूच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं

Related Posts
1 of 1,627

डेंग्यू व्हायरस साधारणतः चार रुपांमध्ये आढळून येतो. याला D1, D2, D3 आणि D4 अशी नावं आहेत. यातल्या DENV-2 किंवा स्ट्रेन D2 मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात. यामध्ये ताप येणं, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, जुलाब अशी लक्षणं आढळतात. यातली बरीचशी लक्षणं ही कोविडमध्येही असल्यामुळे निदान करणं अवघड असतं. या व्हेरियंटवर लवकर उपचार केले नाहीत, तर तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.

महिला पोलिसांच्या ड्युटीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता …..

कोविडपेक्षा डेंग्यूमध्ये एक समाधानाची बाब म्हणजे तो श्वासाद्वारे पसरत नाही. मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य काळजी घेतली नाही तर हा नवा व्हेरियंट थैमान घालण्याचा धोका आहे.

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: