दलीत तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ,बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0 9
 श्रीगोंदा –   श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय दलीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी वैभव बाळू खामकर रा.पिंपळगाव पिसा व निलेश उर्फ सोनु गायकवाड रा.निंबवी यांच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवार दि.१ जानेवारी रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानव्ये व बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मुख्य आरोपी वैभव बाळू खामकर याला अटक केली असून दुसरा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत .
   या बाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एका १९ वर्षीय दलीत तरुणीला गावातील वैभव बाळू खामकर या तरुणाने मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे म्हणत दि. २५ जानेवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा येथून निंबवी येथील नीलेश उर्फ सोनू गायकवाड या मित्राच्या मदतीने गाडीतुन घेवुन जात .
Related Posts
1 of 1,290

येळपणे येथील प्रेमीयुगलांची रेल्वेखाली आत्महत्या

 दि. २७ जानेवारी रोजी रात्री ९ ते १० च्या वा दरम्यान शहापुर तालुक्यातील यसई गावाजवळ चारचाकी गाडीमध्ये लग्नाचे आमिष दाखवुन जबरी संभोग केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादी वरून दोघांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवार दि.१ जानेवारी रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानव्ये व बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी वैभव बाळू खामकर याला अटक केली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: