Dadra Nagar Haveli By-election Result, शिवसेनेची जोरदार मुसंडी

0 317

नवी मुंबई –  दादर नगर हवेली लोकसभा (Dadar Nagar Haveli Lok Sabha)  मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या (By-election) मतमोजणीत शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार कलाबेन डेलकर (Calaben Delker)  यांनी जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्या शिवसेनेकडे ५ हजार ५०६ मतांनी आघाडी घेतली आहे.  (Dadra Nagar Haveli By-election Result, Shiv Sena’s strong push)

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जारा रिक्त झाली होती. दरम्यान, येथे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी दिली गेली.निवडणूक आयोगाच्या १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना १८ हजार ९९२ मते मिळाली आहेत आणि भाजपाच्या महेशभाई गावित यांना १३ हजार ४८६ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना ७४७ मते मिळाली आहेत.  

हे पण पहा – मोक्का प्रकरणातील आरोपी पठारे मुक्त | अजय पठारेला जामीन मंजूर

तर दुसरीकडे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील  देगलूर विधानसभेच्या (Deglaur Assembly)  पोटनिवडणुकीची मत मोजणी सुरु आहे. तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10  हजार 712  मते मिळाली असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमदेवार सुभाष साबणे यांना 7 हजार 448 मते मिळाले आहे. पहिल्या तीन फेरीचा विचार केला ते आता पर्यंत या जागेवर काँग्रेसने 3 हजार 264 मतांनी आघाडी घेतली आहे.

या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. (Dadra Nagar Haveli By-election Result, Shiv Sena’s strong push)

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस ने सहा वर्षासाठी निलंबित केले चौदा नगरसेवक

Related Posts
1 of 1,635
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: