दबंग गर्ल सोनाक्षी होणार खान परिवाराची सून?, अनेक चर्चाना उधाण

0 904

नवी मुंबई –   बॉलीवूडची दबंग गर्ल  म्हणून ओळखली जाणारी चर्चित अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते. कधी आपल्या चित्रपाठामुळे तर कधी आपल्या खाजगी आयुष्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. यावेळी देखील ती आपल्या खाजगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेनुसार सोनाक्षी लवकरच सोहेल खान (Sohail Khan)चा मेहुणा बंटी सचदेवाशी (Bunty Sachdevashi) लग्न करणार आहे.मात्र याबद्दल अद्याप काही स्पष्टीकरण समोर आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार  सोनाक्षी म्हणाली की शाळेत असताना तिला खरे प्रेम झाले होते. पण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिने त्या मुलाला बाय म्हटलं आणि पुढे निघाली. ५ वर्षांपेक्षा जास्तवेळ सोनाक्षी त्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिने त्या मुलाचं नाव सांगितलं नाही. तर तो मुलगा बंटी सचदेवा असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, सोनाक्षी आणि बंटी दोघांचे पार्ट्यांमधले बरेच फओटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच काय तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोनाक्षीला चित्रपट सृष्टीत लॉन्च केलं आणि आता सोनाक्षी त्याच्या कुटुंबाचा एक भाग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Related Posts
1 of 84

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राच्या पुन्हा अडचणीत वाढ ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: