सायबर पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने; महिलेचा एसपी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न..

0 180
A case has been registered against four persons from Kashti on the orders of the Commissioner of Police

अहमदनगर – सायबर पोलिसांनी (cyber police) फिर्याद न घेतल्याच्या रागातून एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलीस(Camp police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ती महिला श्रीगोंदा तालुक्यातील आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शफी सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.

Related Posts
1 of 2,427

बुधवारी दुपारी सदर महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. तिचा फोटो एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याची तिची तक्रार होती. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ती महिला आधी बेलवंडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यामुळे ती महिला सायबर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, सायबर पोलिसांनी तुमची तक्रार आमच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक व्ही. सी. गंगावणे करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: