“या” जिल्ह्यात पुन्हा जमावबंदी आदेश, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 422
अकोला –   कोरोना विषाणूच्य (Corona virus) संक्रमणाच्या दरम्यान ओमिक्रॉन (Omicron) ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्याने संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा (Nima Arora) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये अकोला (Akola) जिल्ह्य्हात जमावबंदीचे (Curfew) आदेश निर्गमित केले आहेत. (curfew order in “this” district, find out the full details)
या आदेशान्वये  जिल्ह्यात रविवार दि.५ डिसेंबर मध्यरात्री १२ वा. पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.  या काळात कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इ. आयोजन करता येणार नाही.  या कालावधीत कोविड लसीकरणाचे काम नियमित सुरु राहिल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (curfew order in “this” district, find out the full details)

 

Related Posts
1 of 1,603

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: