
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – IPL 2022 च्या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन दिग्गज संघ आमनेसामने असतील. चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांसाठी सामना जिंकणे आवश्यक आहे. मुंबईच्या संघाला या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही, अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला विजयाचे खाते उघडायचे आहे. पण चेन्नईसाठी ही बातमी चांगली नाही. या सामन्यापूर्वी एक स्टार खेळाडू संघाबाहेर आहे. आणि हा खेळाडू आहे डेव्हन कॉनवे (Devon Conway).
डेव्हॉन कॉनवे त्याचा देशात परतला आहे, कारण डेव्हॉन कॉनवे काही दिवसात लग्न करणार आहे. आजच्या सामन्यातून डेव्हॉन कॉनवेसारखा महान खेळाडू आऊट झाला आहे. मात्र, डेव्हॉन कॉनवे पुढच्या सामन्यापूर्वी संघात पुनरागमन करणार आहे.
मोठी बातमी! MHT CET Exam 2022 पुढे ढकलली; जाणून घ्या नेमका कारण#MHT_CET_Exam #CET #Exam #Maharashtra https://t.co/vmkiE3xso4
— DNA (@dnamarathi) April 21, 2022
आपल्या देशाला रवाना होण्यापूर्वी डेव्हन कॉनवेने चेन्नईच्या सर्व खेळाडूंना मुंबईच्या हॉटेलमध्ये पार्टीही दिली. मात्र, आज चेन्नईसाठी करा किंवा मरोची स्पर्धा होणार आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा आयपीएलच्या सर्व चाहत्यांना चुरशीच्या स्पर्धेची अपेक्षा असते.