क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण, एनसीबी शाहरुखच्या ‘मन्नत’वर दाखल

0 222

 नवी मुंबई –  अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला एनसीबी (NCB) ने क्रुझवरील ड्रग्स पार्टी (Cruise Drugs Party ) प्रकरणात अटक केल्यानंतर आता या प्रकरणात एनसीबेने तपास सुरु केला असून आता या प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. आज एनसीबीने मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारण्यात आला आहे. आर्यन खानच्या चॅटमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाल्यानतंर तसंच काही नावं समोर आल्यानंतर या कारवाईने वेग आला आहे . याचाच एक भाग म्हणून एनसीबीचा एक  पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं होतं.(Cruise Drugs Party case, NCB filed on Shah Rukh’s ‘Mannat’)

एनसीबीचे अधिकारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते.  एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होऊ शकण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.

तर दुसरीकडे अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) याची मुलगी चर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिचा देखील नाव समोर आला असून एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहिती नुसार  एनसीबीला आर्यन खानसोबत उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीच्या व्हाट्सअँप चॅट मिळालेल्या आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

Related Posts
1 of 1,520

शाहरुख खानने घेतली आर्यन खानची भेट.., पहा हा व्हिडिओ

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे.  (Cruise Drugs Party case, NCB filed on Shah Rukh’s ‘Mannat’) 

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: