एसटी आयोगाच्या उपाध्यक्षाच्या “त्या ” विधानावरून नवाब मलिक यांची टीका, म्हणाले

0 138

नवी मुंबई –   सध्या संपूर्ण देशात चर्चचा विषय बनलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे ( Sameer Wankhade) यांनी धर्म बदलला नाही असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्ष (Deputy Chairman of the ST /SC Commission) अरुण हलदर (Arun Haldar) यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यांचा समाचार घेत काही प्रश्न उपस्थित केले आहे. (Criticism of Nawab Malik on the “that” statement of the Deputy Chairman of the ST Commission, said)

नवाब मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाले कि अरुण हलदर हे संवैधानिक पदावर बसले आहेत. त्यांनी या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. एससी/एसटी आयोगाची एक कार्यप्रणाली आहे. एखाद्याने तक्रार केली तर त्याची चौकशी केली पाहिजे. त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे. परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली आहे.

अभिनेत्री कतरिनाचा सलमान खानवर मोठा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Related Posts
1 of 1,512

पुढेबोलताना नवाब मलीक यांनी परत एकदा समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्माने मुस्लिम आहेत, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे. एससी प्रमाणपत्रात खोटेपणा करून एका गरीब अनुसूचित जातीच्या उमेदवाराचा हक्क हिरावून घेत समीर वानखेडे त्या पदावर बसले आहेत, असा आरोप ही केला आहे. (Criticism of Nawab Malik on the “that” statement of the Deputy Chairman of the ST Commission, said)

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: