SL vs IND सिरीजवर संकट…, टीममध्ये कोरोनाचा शिरकाव

0
नवी मुंबई –  13 जुलै (July 13) पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध भारत (Sri Lanka vs India) मालिकेवर सध्या संकट ओढावलं आहे.श्रीलंकन संघामध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. इंग्लंडच्या दौऱ्या परतलेल्या श्रीलंकन संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक ग्रान्ट फ्लॉवर (Batting coach Grant Flower)  यांची कोरोना (Corona) चाचणी पोस्टिव्ह आली आहे.  यामुळे श्रीलंका विरुद्ध भारत मालिकेवर संकट ओढावलं आहे
 इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंका संघाच्या सगळ्या सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणी चे आता आले आहे. या सर्व प्रकरणावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मात्र श्रीलंका विरुद्ध भारत वनडे सीरिज वेळेत सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विवाहित महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Related Posts
1 of 42

श्रीलंका आणि इंग्लंड सीरिजनंतर इंग्लंड टीमच्या सात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, यानंतर श्रीलंका टीमबाबतही संशयाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळेच श्रीलंकेच्या खेळाडूंना इंग्लंडहून परतल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. या खेळाडूंना कोलंबोच्या हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं.  श्रीलंकेचे 13 खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत आणि त्यांची कोरोना टेस्ट झाली आहे.  भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची मालिका श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे.  भारतीय संघ या मालिकेत शिखर धवन (shikhar dhawan)  यांच्या नेतृत्वात खेळणार आहे .

महसूल मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: