दरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

0 88

अहमदनगर –   दरोड्याची तयारीचे गुन्ह्यामध्ये मागील ४ वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार (criminal) सागर गोरख मांजरे या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये आरोपी सागर गोरख मांजरे, (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) हा त्याचे सात साथीदारासह दरोड्याची तयारी करुन अहमदनगर शहरामध्ये कोठेतरी दरोडा घालण्यासाठी जात असताना हत्यारे व वाहनासह मिळून आल्याने सदर घटनेबाबत तोफखाना पो.स्टे. येथे गुरनं. ५१६/२०१७ भादवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हे पण पहा –Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर

Related Posts
1 of 1,608

सदरचा गुन्हा घडला त्यावेळी नमूद गुन्ह्यातील आरोपी सागर गोरख मांजरे याचा साथीदार गोविंद बाळू गुंजाळ, (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) हा घटनास्थळावरून फरार झालेला होता व तेव्हापासून वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाणे बदलून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता. सदर फरार आरोपीचा पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाख अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना/संतोष लोढे, पोकॉ/विनोद मासाळकर, जालिंदर माने, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे असे शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली कि, आरोपी गोविंद गुंजाळ हा त्याचे उक्कलगाव, ता. श्रीरामपूर येथील घरी येणार आहे अशी बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी उक्कलगाव येथे जावून सापळा लावून आरोपी नामे गोविंद बाळू गुंजाळ, वय- २६ वर्षे, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर यांस ताब्यात घेवून तोफखाना पो.स्टे. ला हजर केले आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. करीत आहे.

गहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 12 जनावर गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: