ग्रामसेवक गवांदे आत्महत्या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

0 390

श्रीगोंदा –  सौताडा येथील धबधब्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केलेल्या ग्रामसेवक (Gramsevak ) झुंबर मुरलीधर गवांदे यांचा मृतदेह सापडला असून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडघुलचे ग्रामपंचायत चे उपसरपंच रामदास बन्सी घोडके व आनंदा शिंदे या दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यासंदर्भात  मयत गवांदे यांच्या पत्नी मनीषा गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. मयत झुंबर गवांदे यांनी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी बीड जिल्ह्यातीळ सौताडा येथील धबधब्याखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. गवांदे यांना उडी घेताना काही प्रत्यक्षदर्शीनी पाहिले होते त्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला मात्र त्यांचा मृतदेह आढळुन आला नाही. काल त्यांचा मृतदेह मिळुन आला. त्यानंतर आज सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

मयत गवांदे हे वडघुल येथे ग्रामसेवक म्हणून कर्तव्य बजावत होते. वडघुल ग्रामपंचायतचे उपसरपंच रामदास बन्सी घोडके व आनंदा शिंदे यांनी गावातील वनखात्याच्या जमीनीवरील गावक-यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर करून  त्याची रजिस्टरला नोंद करुन त्यांचे नावे लावण्यासाठी दबाव आणत होते. मात्र ग्रामसेवक गवांदे यांनी त्यास नकार दिला. त्यावर वरील दोन्ही आरोपींनी त्यांना कार्यालयातुन बाहेर काढुन कार्यालयाला कुलुप लावले. ग्रामसेवक गवांदे यांना कामावरुन हाकलुन लावले. तुम्ही आमचे काम करत नाही तोवर कामावर यायचे नाही असे म्हणत गावासमक्ष अपमान केला.दरम्यान उपसरपंच घोडके याने मयत गवांदे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. वरील दोघांनी सप्टेंबर महिन्यातील ग्रामसभेदिवशी ग्रामसेवक गवांदे यांना  ग्रामपंचायत कार्यालयात सर्वासमक्ष झाडु मारायला लावुन त्यांचा अपमान केला व त्याचा व्हीडीओ व्हायरल केला. हा अपमान त्यांना सहन झाला नाही तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते.

Related Posts
1 of 1,481

शोकाकुल वातावरणात ग्रामसेवक गवांदे अंत्यविधी मध्यरात्री पार पडला, एकाच दिवशी अंत्यविधी, सावडणे, आणि दशक्रिया विधी झाल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. वरिष्टांकडे दिलेल्या खोट्या अर्जामुळे फिर्यादीचे मोठ्या मुलीच्या किडनीच्या ऑपरेशनवेळी त्यांचा रजेचा अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे या सर्व गोष्टींचा त्रास असह्य झाल्याने ग्रामसेवक गवांदे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

विधवा महिलेला दागिने मोडायला लावण्याच्या प्रकरणात 3 जण निलंबित

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: