लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

0 221
श्रीगोंदा-  श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणी व्यंकनाथ (Loni Venkanath) येथील ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) सन २०१८ ते २० या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातील शासकीय निधीचा गैरवापर करत विकास कामात अनियमितता, प्रशासकीय अनियमितता व मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार प्रकरणी गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे, एस. पी. जगताप, दादा मडके, स्वप्निल लाटे यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून झालेल्या चौकशी अहवालात दोषी आढळल्याने राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा समर्थक तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने, विद्यमान सरपंच रामदास बबन ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी सोमवार दि.२० रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. काकडे यांच्या उपोषण आंदोलनाला अखेर प्रशासन नमल्याने अपहार प्रकरणी आजी-माजी सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सन २०१८ ते १९ दरम्यान तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगातील निधी व वित्त आयोगाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली काही कामे इन्व्हर्टर खरेदी, कार्यालय पीओपी, स्मशानभूमी मुरुमीकरण, कार्यालय विस्तार, पेव्हर ब्लॉक, एलईडी दिवे, फर्निचर इत्यादी कामात अनियमितता व कागदोपत्री कामे दाखवून २५ लाख ५६ हजार २५२ रुपयांचा अपहार व फसवणूक त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर यांच्या जानेवारी २०२० ते आजअखेर कालावधीत पवारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत व शेंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत या कामात प्रत्यक्ष काम न करता  १ लाख ३२ हजारांची बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक लेखा परीक्षा कार्यालय यांच्या संयुक्त चौकशीत एकूण २६ लाख ८८ हजार ३५२ रुपयांचा अपहार व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी सरपंच संतोष माने, विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सध्या सेवा निवृत्त असलेले रामभाऊ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक व आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Posts
1 of 1,640
गुन्हा दाखल होण्याआधी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व पोलिस उपनिरीक्षक अमिल भारती यांनी ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ येथे भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार माळी हे करत आहेत.
राजेंद्र काकडे सामाजिक कार्यकर्ते लोणी व्यंकनाथ 
गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. आत्ता फक्त २६ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. अजून लाखो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपद नाममात्र आहे. याचा कर्ताकरविता दुसराच असून लवकरच त्याच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत. जनतेचे व शासनाचे पैसे खाणारे लवकरच गजाआड होणार आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: