माहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग, कोतवालीत तरुणाविरूद्ध गुन्हा

0 316

अहमदनगर –  माहेरी आलेल्या विवाहितेसोबत घरात घुसून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस (Kotwali Police) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली आहे . बाळासाहेब नामदेव वाबळे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.  (Crime against a young woman )

पीडित महिला दिवाळीनिमित तिच्या माहेरी आली होती. २५ नोव्हेंबर रोजी पीड़ित महिला घरी असताना बाळासाहेब वाबळे तिथे आला. त्याने पीडितेला जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडिता त्याला विरोध करत असताना तिच्या गळ्यातील गंठण तुटून गहाळ झाले आहे. याच दरम्यान, पीडितेचा पती त्याठिकाणी आला असता वाबळेने त्यालाही शिवीगाळ करत तुम्ही कुठे जाताय, असे म्हणत तलवारीने कापण्याची धमकी दिली. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

फडणवीस नंतर शरद पवार देखील दिल्लीत दाखल, अनेक चर्चाना उधाण

बापनेच केला पोटच्या मुलीवर आत्याचर
ठाणे( Thane) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यात बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार (daughter) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,603

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दोन मुली असून मोठी मुलीचा वय 13 वर्ष असून दुसरीचं 6 वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचं बऱ्याचं दिवसांपासून पटत नसल्याने वेगळे राहत होते. त्यामुळे मोठी मुलगी पित्यासोबत राहत होती तर लहान मुलगी आईसोबत भगतपाडा येथे राहत होती. या दरम्यान आरोपी पिताने मागच्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवतीदेखील राहिली होती. माञ काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली. त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले. 

आरोपीने पुरावे नष्ट करूनही पिडीतेच्या आईला याबद्दल समजलं. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याबाबत विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत सारा प्रकार सांगितला. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ((Crime against a young woman )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: