लग्न समारंभात नवरा-नवरीसह नातेवाईकांची करण्यात आली कोविड टेस्ट 

0 12

नागपूर –  राज्यात कोरोनाचा प्रभाव जास्त वाढत असल्याने प्रशासने खबरदारी घेत राज्यात अनेक निर्बंध टाकले आहे . राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोनाचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढत आहे.  अशातच नागपुर  जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी एक लग्न समारंभ पार पडला.  हा लग्न समारंभ राज्यात चर्चेचा विशेष बनला आहे .

कारण असे की, लग्न समारंभातील वधू- वरासह त्यांच्या २६  पाहुण्यांची सुद्धा कोविड टेस्ट मंगल कार्यालयातच  करण्यात आली. नरखेड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात कोविड चाचणी पार पडली.

डॉक्टरने एकतर्फी प्रेमात घातला बुरखा आणि मग …

Related Posts
1 of 1,301

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आणि लग्न कार्यातून मोठ्या संख्येत कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत असल्याने अश्या चाचण्या करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी गायकवाड यांचे म्हणणे आहे. लग्नसमारंभात कोविड टेस्ट करून नागपूर जिल्ह्यातील वधू वरांनी एकप्रकारे नवीन आदर्श इतरांसाठी निर्माण केला आहे .

ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु – अजित पवार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: