कापूस व्यापार्‍याला गावठी कट्टा लावत 7 लाखला लुटले, आरोपीला अटक

0 231

जळगाव –  एका कापूस व्यापार्‍याला (Cotton trader) सोनाळा फाट्याजवळ गावठी कट्टा लावत त्याचा जवळ असणारे सात लाख रूपये लुटण्याची घटना घडली आहे. बुधवार दी.24 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात जळगाव गुन्हा शाखेने पाच आरोपींना अटक केली आहे. गोपाल हरी पाटील,गोपाल श्रावण तेली,प्रवीण रमेश कोळी,प्रमोद कैलास चौधरी, लाखन दारासिंग पासी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.(Cotton trader looted Rs 7 lakh from village, accused arrested)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान पप्पू ती स्टॉल पासून 200 मीटर अंतरावर मोटरसायकलवर दोन जण त्यांचा पाठलाग करत होते तर तलावाजवळ आधीच दोन जण थांबलेले होते. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांची मोटरसायकल अडवत गावठी कट्टा लावून त्यांच्याकडील सात लाखांची रक्कम लुटली.

यानंतर जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे गोपाल हरी पाटील यास संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्यास बोलते केल्यानंतर त्याने अन्य चार साथीदारांची नावे सांगत लुटीतील रक्कम आपसात वाटून घेतल्याची कबुली दिली.

Related Posts
1 of 1,481

स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादी देणार मोठा झटका ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुन्हे शाखेने चौघांना अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देत लुटीत वापरलेला गावठी कट्टा, दुचाकी, पाच मोबाईल तसेच रोकड मिळून एकूण पाच लाख 96 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला.(Cotton trader looted Rs 7 lakh from village, accused arrested)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: