नगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके

0 92

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा नागरपरिषदेने (Shrigonda Nagar Parishad) दि 19 सप्टेंबर रोजी बाजार तळातील गाळ्याच्या शुद्धीपत्रक जाहीर केले होते ते बेकायदेशीर आहे त्यामुळे ते रद्द करण्यात यावे नाहीतर कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत घोडके ( Bharat Ghodke) यांनी पत्रकातून केली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषदेने आरक्षण क . ३३ मधिल बाजारतळ , दौंड -जामखेड रोड , सि.स.नं. २१४१ शॉपींग सेंटरमधील गाळा क १ ते १२ याचा जाहीर ई लिलाव सुचना दि . २७ आगस्ट रोजी प्रसिध्द करून दि . १७ सप्टेंबर पर्यंत ई लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेवुन फी रक्कम १००० / – व अनामत रक्कम ५०,००० / भरणा करून त्याबाबतचे कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावे व उपरोक्त कागदपत्रांच्या मुळ प्रत बंद लिफाफयामध्ये नगरपरिषद कार्यालयामध्ये दि . १७ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५.०० वा पर्यंत सादर करावीत त्याप्रमाणे अर्जदार व इतर व्यक्तींनी सदर जाहीर ई लिलावामध्ये भाग घेवुन सदर लिलावाचे सुचनामप्रमाणे , अटिशर्तीप्रमाणे पुर्तता केलेली आहे व सदर कागदपत्रे डिपॉजिट हे दि . १७ सप्टेंबर रोजीचे पुर्वी सदर नगरपरिषदेमध्ये जमा केलेले आहेत .

हे पण पहा –Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर

Related Posts
1 of 1,640

असे असताना सदर नगरपरिषदेने दि . १८ सप्टेंबर रोजी शुध्दीपत्रक सदर जाहीर ई लिलावाबाबतची सूचना प्रसिद्ध करून पुन्हा दि . २४ सप्टेंबर पर्यंत सदर लिलावामध्ये सहभाग होण्यासाठी प्रसिद्ध केलेली आहे , ती चुकीची व बेकायदेशीर आहे कारण शुध्दीपत्रक मध्ये नमुद केले आहे की , लिलावाला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे ही बाब चुकीची , बेकायदेशीर आहे . कारण राजकीय लोकांच्या सांगण्यावरून सदरचे शुध्दीपत्रक काढलेले आहे ते रद्द होणे आवश्यक आहे . कारण जाहीर ई लिलावाच्या सुचनेप्रमाणे १ ते १२ गाळयांसाठी १६ व्यक्तींनी भाग घेतला होता त्यामुळे अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही हे चुकीचे आहे . कारण १२ चगाळे होते व १६ व्यक्तीनी प्रतिसाद दिलेला होता त्याप्रमाणे १२ व्यक्तींनी सदर ई लिलावामध्ये भाग घेवून ई लिलावाचे सूचनांप्रमाणे प्रक्रिया पुर्ण केलेली आहे . सदर व्यक्तीनी सदर डिपोजिट ‘ हे लोकांचे कर्ज काढून , उसने घेवुन पुर्ण केलेले आहे . सदर नगरपरिषदेच्या अटी , शर्तीचे पालन केलेले आहे असे असताना पुन्हा शुध्दीपत्रक काढुन ई लिलावाची प्रकिया करता येणार नाही केल्यास अर्जदार हे नगरपरिषदेवर आंदोलन करतील अथवा कायदेशीर कारवाई करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भारत घोडके यांनी पत्रकातून दिला आहे.

जिल्ह्यात महिला तलाठ्यास शिवीगाळ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: