कोरोनाचा आयपीएलला ही बसला फटका …, बीसीसीआयचा मोठा निर्णय…  स्पर्धा रद्द

0
 नवी मुंबई –   देशात फेब्रुवारी महिण्यापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्यालाटे मुळे देशात अनेक निर्बंध लागू आहे याच कारणाने  देशात अनेक कार्यक्रम रद्द झाले आहे . या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा फटका आयपीएललाही बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
काल सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे.

कोरोना रोखण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय – राहुल गांधी

Related Posts
1 of 42

मुक्काम पोस्ट.. नगर कारागृह… कारागृहात मोबाईल सापडल्यामुळे मुक्काम पोस्ट हलविले  

बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: