
आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना रूग्णं संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.
या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावावे की नाहीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बंदिस्त असलेल्या परिसरात मास्क सक्ती अनिवार्य करण्याची तसेच मॉल्स, नाट्यगृह, थिएटर्समध्ये मास्क सक्ती लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. आता या शिफारसीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. (Corona grows again: State government to take big decision on mask; An announcement to be made soon)