नागरिकांना दिलासा : आज होणाऱ्या शटडाऊनबद्दल महावितरणने घेतला मोठा निर्णय

0 950
Consolation to the citizens: MSEDCL has taken a big decision regarding today's shutdown

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

अहमदनगर – आज शनिवारी दि. ९ एप्रिल रोजी अहमदनगर शहरासह  (Ahmednagar city) ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची घोषणा महावितरणने केली होती. यामुळे शहरातील नागरिकांनी महावितरणनाच्या या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नागरिकांचा रोष लक्षात घेता महावितरणने मोठा निर्णय घेत शटडाऊन (shutdown)रद्द केल्याची घोषणा केली आहे.  शहरातील फक्त एमआयडीसी परिसरात शटडाऊन असणार आहे.
Related Posts
1 of 2,427
महावितरणने शनिवारी होणाऱ्या दुरुस्तीची कामे पुढे ढकलली आहेत. शहरातील फक्त  एमआयडीसीत ही कामे होतील. उर्वरित शहरात शनिवारी वीजपुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांनी दिली.  मागच्या तीन दिवसांपासून शहरातील विविध भागात रात्री भारनियमन सुरू झाले होते. यातूनच केडगाव येथील महावितरण कार्यालयात नागरिकानी तोडफोड केली.
  या भागात आज वीज पुरवठा होणार होता खंडित 
अहमदनगर शहरातील  प्रोफेसर कॉलनी चौक, चितळे रोड, एमएसईबी कॉलनी, समता कॉलनी, साईनगर, फुलसुंदर मळा, चिपाडे मळा, भवानी नगर, माळीवाडा, हातमपुरा, जुना बाजार, जुने कलेक्टर ऑफिस, जी.पो.ओ ऑफिस,कुष्ठधाम रोड, गावडे मळा,  कापड बाजार, सर्जेपुरा, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहाजी रोड, सावेडी, गुलमोहर रोड, तारकपूर, भिस्तबाग, मार्केट यार्ड, सारसनगर, विनायकनगर, भोसले आखाडा, किग्ज गेट, पारशा खुंट, तपकीर गल्ली, अडते बाजार, भूषण नगर तसेच कोळगाव, वाळकी, जुने मुकुंदनगर,  दर्गा दायरा , सीआयव्ही सोसायटी, जेऊर, पांगरमल, उदरमल, धनगरवाडी, बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, वाघवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, पिंपळगाव, माळवी, मांजरसुंबे, डोंगरगण, अरणगाव, सोनेवाडी, नारायणडोह.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: