शेतकऱ्यांना दिलासा ! ‘या’ तारखेपासून राज्यात बरसणार पावसाच्या सरी

0 415
Consolation to farmers! Rain showers in the state from this date
 
मुंबई –  देशासह राज्यात मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पहिला मिळत आहे. या लाटेमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना (farmers) देखील अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. उष्णतेच्या लाटामुळे राज्यात अनेक शेततकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात यावेळी 6 जून रोजी मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत वेळेआधीच मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 1 जूनला केरळमध्ये, तर 6 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय. पुढच्या 3 ते 4 दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,211

तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढच्या 3 ते 4 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

 

 

लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं

लातूर जिल्ह्याला काल संध्याकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.  या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेचं नुकसान झालंय. या भागात केशर आंबा बागेचं मोठं क्षेत्र आहे. विक्रीला तयार असणारा आंबा ह्या वादळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: