
मुंबई – लग्नसराईच्या महिन्यात आज पुन्हा एकदा सोन्याचा दर (Gold Price Today) कमी झाल्याने बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. जवळपास तीन महिन्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या संधीचा फायदा घेत बाजारात अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे.
बाजारात आज 24 कॅरेट शुद्धते सोन्याची किंमत 228 रुपयांनी घसरून 50 हजार 358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आजच्या व्यवहारात सोने 50 हजार 445 रुपयांवर खुले झाले होते. सोन्याबरोबरच चांदीही स्वस्त झाली आहे. आज चांदी 60 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 280 रुपयांची घसरण झाली आहे.
Related Posts
चांदीने आज 60,525 रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू केला, परंतु विक्री वाढल्याने त्याची किंमत लवकरच 0.46 टक्क्यांनी घसरून 60,338 वर आली. खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारही चिंतीत; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितली दर कमी करण्यासाठी काय असेल रणनिती? जागतिक बाजारातही भाव कमी झाले जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. अमेरिकन सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. येथे सोने प्रति औंस $1,832.06 वर विकले गेले. चांदीची स्पॉट किंमतही 0.1 टक्क्यांनी घसरून 21.23 डॉलर प्रति औंस झाली. याशिवाय इतर मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार दिसून आले.
डॉलरच्या दरातही काहीशी घसरण झाली असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. याशिवाय IMF ने यावर्षी जागतिक विकास दर कमी केल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होत आहे.