UPA अध्यक्षपदावरून काँग्रेस- राष्ट्र्वादीत होणार वाद; दिल्लीत घडामोडींना वेग

0 219
Congress-Nationalist controversy over presidency; Accelerate developments in Delhi

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

दिल्ली – देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या पाच पैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) विजय मिळवला आहे.  यानंतर पुन्हा एकदा आता देशातील सर्व विरोधकांना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्तावरुन वादंग सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला.  काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं या ठरावात म्हटलं आहे.

देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं, असंही या ठरावात नमूद आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी जो तरुण विचारसरणी आणि संघटनेचा मुळ उद्देश पूर्णपणे समजून घेतो तो एक दिवस राजकारणात नक्की यशस्वी होतो असं शरद पवार यावेळी म्हणाले. आपली विचारसरणी गांधी, नेहरु, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारसरणीपासून प्रेरित आहे. या सर्व लोकांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला,” असंही शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एक नवी दिशा दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारसरचणी एकच आहे, फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे,असं शरद पवारांनी सांगितलं.

Related Posts
1 of 2,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: