काँग्रेस नेते सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण

0 1,205

नवी मुंबई –   महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) कडून प्रसारमाध्यमात भारतीय जनता पक्षा (BJP) वर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाकडे कडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षावर जाऊन थेट भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आला असून या भेटी नंतर अनेक राजकीय  तर्क-वितर्क लावलेल्या जात आहे. (Congress leader Sachin Sawant’s visit to the Chief Minister sparked many discussions in political circles)

मंगळवारी महाराष्ट्र काँग्रेसकडून पदभारांमध्ये बदल करत सचिन सावंत यांच्याकडे फक्त प्रवक्तेपद ठेवलं, तर अतुल लोंढे यांच्यावर मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .

काँग्रेसमध्ये इनकमिंग …….! राजकीय गोटात हालचालींना वेग

Related Posts
1 of 1,640

प्रदेश काँग्रेसने नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यात लोंढे यांची मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. राजकीय कार्यक्र माची जबाबदारी  हुसेन दलवाई व गणेश पाटील, पक्षाच्या विविध आघाड्या व विभागांची जबाबदारी अलीकडेच भाजपमधून पक्षात दाखल झालेल्या डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. सचिन सावंत हे राज्यातील भाजप सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असत. त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले होते.  नव्या रचनेत फक्त प्रवक्ते पदी कायम ठेवण्यात आल्याने सावंत यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाकडे केली.(Congress leader Sachin Sawant’s visit to the Chief Minister sparked many discussions in political circles)

 हे पण पहा  – कुणाला रुपया भेटू देणार नाही पोलीस स्टेशन ला.नेवासा नंतर पाथर्डी पोलिसांची ऑडियो क्लिप

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: