विधान परिषद निवडणूकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

0 453

नवी मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीसाठी काँग्रेसचे दिवगंत नेते राजीव सातव( Rajiv Satav) यांची पत्नी प्रज्ञा सातव( Pragya Satav) यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीची पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.(Congress announces candidature for Pragya Satav)

काही दिवसांपूर्वी काँगेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे.काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

राहुल गांधींचे विश्वासू

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. राहुल गांधी प्रत्येक निर्णय घेताना राजीव सातव यांच्याशी चर्चा करायचे. या दोन्ही नेत्यांची चांगली मैत्री होती. त्यामुळेही प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Related Posts
1 of 1,640

कार्यकारिणीतही स्थान

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यता आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती. (Congress announces candidature for Pragya Satav)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: