“त्या” खून खटल्यातील ‘छोटा भीम’ला सशर्त जामीन

0 188

औरंगाबाद – नांदेड (Nanded) सराफ बाजारामधील गुरुकृपा ज्वेलर्सचे मालक रवींद्र चक्करवार यांच्या खून खटल्यातील एकमेव आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम कोतवाल याला खंडपीठाचे न्या. एम. जी. सेवलीकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला. नांदेडच्या सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपी भीम याने न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाऊ नये, या अटीवर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

२५ ऑक्टोबर २०१९ च्या रात्री रवींद्र चक्करवार यांचा खून झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे कपडे व इतर पुराव्यांच्या आधारावर २९ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम याला अटक केली होती. २२ जानेवारी २०२० ला पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.

DySP संदीप मिटके ॲक्शन मोडमध्ये,हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

Related Posts
1 of 1,603

३ मार्च २०२१ रोजी नांदेड सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयानेही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. काही अतिरिक्त नवीन मुद्दे व जवळपास दोन वर्षे जेलमध्ये झाल्याच्या आधारावर आरोपीने अॅड. गजानन कदम यांच्यामार्फत जामिनासाठी पुन्हा खंडपीठात धाव घेतली.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: