चिंता वाढली , राज्यात मागच्या १३ दिवसात १२५ टक्के ने वाढला कोरोना 

0
 नवी मुंबई –  राज्यात जानेवारी महिन्यापर्यंत अगदी संपवण्याचा मार्गावर असलेला कोरोना विषाणूने राज्यात  १ फेब्रुवारी पासून परत एखादा वाढण्यास सुरुवात केल्याने राज्याच्या  चिंतेत मोठी भर पडली. जानेवारी महिन्या पर्यंत दररोज ३ हजार कोरोनाबंधित रुग्ण राज्यात सापडत होते मात्र १८ मार्च येता येता हा आकडा २५ हजारवर पोहोचला आहे.  या आकड्याने राज्याच्या चिंतेत भर घातली आहे. हा आकडा असच वाढत राहिला तर राज्यात परत एखदा लॉकडाउन लागणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मागच्या चोवीस तासात सापडलेल्या नवीन कोरोनाबंधित रुग्णाच्या संख्याही करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. तर राज्यात मागच्या १३ दिवसांमध्ये कोरोना विषाणू तब्बल १२५ टक्केने वाढला आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात फेब्रवारीपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारांच्या काठावर पोहचली. तर मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी झोप उडवणारी आकडेवारी समोर आली. राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत.

Related Posts
1 of 1,171

बोठेने सांगितला घटनाक्रम , मात्र हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.. 

राज्यात पहिली लाट आली, तेव्हा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. या पूर्वी सर्वाधिक रुग्ण १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ नोंदविले होते. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. मागच्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.

शरद पवार तुम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका ,काँग्रेस नेत्याचं पत्र

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: