
नगर : आधुनिक युगात संगणक ज्ञान हे महत्त्वाचे असून नाईट स्कूलचे विद्यार्थी यामध्ये मागे राहू नये. यासाठी खूप महत्वाचे मासूम संस्थेने नाईट स्कूलमध्ये केलेला हा आगळा-वेगळा उपक्रम अतिशय स्त्युत्य आहे. फिरत्या संगणक लॅबचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी संगणकीय ज्ञान संपादन करावे, असे प्रतिपादनआमदार संग्राम जगताप यांनी केले. झारेकर गल्ली,समजेल जवळील नव विद्या प्रसारक मंडळाचे सरस्वती मंदिर नाईट स्कूल व मासूम संस्थेच्या सहकार्याने फिरती संगणक लॅबचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
तसेच मोफत संगणक प्रशिक्षण शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, नव विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे मानद सचिव निलेश वैकर उपाध्यक्ष, डॉ. अनिरुध्द गिते, सदस्य मंगेश धर्माधिकारी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, चितांबर विद्यालयाचे मुख्याध्यापिका विभावरी रोकडे, भिंगार नाईट स्कूलच्या मुख्याध्यापिका वाळुंजकर आदी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले,नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेवून एक कर्तव्यदक्ष नागरिक बनावे. कुंटूंबास समाजात एक आदर्श निर्माण करावा, असे ते म्हणाले.
महापालिकेच्या इमारतीवरून एकाची उडी…
नाईट स्कूल मध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा प्रा.सुनिल पंडित यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव निलेश वैकर यांनी केले. मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी नाईट स्कूलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. मासूमचे अशोक चिंधे यांनी संगणक प्रशिक्षणाचे नियोजन केले. मुंबईच्या मासूम संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निकीता केतकर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वीणा कुऱ्हाडे यांनी केले. परिचय व स्वागत विलास शिंदे व देवका लबडे यांनी केला. सुषमा धारूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी कल्याणी पठाडे व राजू भुजबळ यांचे सहकार्य लाभले.