जामखेड नगरपरिषद प्रारूप मतदार यादीच्या हरकतीवर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

0 11

जामखेड –  नगरपरिषदेने प्रारूप मतदार यादी दि. १५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली या मतदार यादीत एका प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात समाविष्ट करण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत माजी नगरसेवकांनी आपले नातेवाईक व जवळचे मित्र प्रभागात घेऊन प्रभागात वर्चस्व निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न केले आहेत आत्ता याच मुद्दय़ावर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी राज्य निवडणूक आयुक्त बलदेव हरपालसिंग यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन देऊन दाद मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी याच मुद्दय़ावर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक निमित्ताने प्रारूप मतदार यादी दि. १५ रोजी प्रसिद्ध केली आहे व २२ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागितल्या होत्या यासाठी २०६७ हरकती प्राप्त झाल्या होत्या या हरकतीचे निराकरण करण्यासाठी प्रशासक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २१ प्रभागात तलाठी, ग्रामसेवक, नगरपरिषद कर्मचारी व मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नियुक्ती करून दि २५ फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते यावेळी अनेक इच्छुकांनी प्रशासक व मुख्याधिकारी यांना स्पॉट पंचनामा करून ज्या प्रभागात मतदार राहील त्याच प्रभागात मतदानाचा अधिकार राहील अशी विनंती केली होती परंतु अनेकांचे समाधान झाले नव्हते त्यातच राज्य सरकारने सदर हरकती निकाली काढण्यासाठी व कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता १ मार्च रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्च पर्यंत कालावधी वाढवला होता.

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

 प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडून म्हणावा असा प्रतिसाद न मिळाल्याने राज्य निवडणूक आयुक्त बलदेव हरपालसिंग यांना जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मुंबई येथील कार्यालयात जाऊन निवेदन दिले व त्यांच्याबरोबर चर्चा केली या चर्चेत मुख्याधिकारी व नगरपरिषद कर्मचारी यांनी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना अंतिम नकाशाप्रमाणे प्रारूप मतदार यादी तयार केली नाही २०६७ हरकती आल्या आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो त्याचे मतदान त्याच प्रभागात पाहिजे परंतु तसे झाले नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित अधिकारी यांना योग्य सुचना कराव्यात तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावे व प्रभाग नकाशाप्रमाणे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी राहूल उगले यांनी केली.

Related Posts
1 of 1,290

श्रीगोंदा पोलिसांच्या कामगिरीवर पोलिस अधीक्षकांनी मारली कौतुकाची थाप..

राजेंद्र कोठारी – प्रदेशउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय याद्यात मोठा घोळ झाला असून कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रभागात आहे अंतिम मतदार यादी नकाशाप्रमाणे नसेल तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: