भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार , अश्लील चाळे केल्याचा आरोप

0 383

बीड –   बीड जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.  बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा हजारीवर आरोप आहे. डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरचा विद्यमान नगराध्यक्ष आहे.

तर दुसरीकडे त्याच्या विरोधात डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनकडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.हा गुन्हा विरोधात आज असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.
Related Posts
1 of 1,518
प्रकरण काय 
डॉ. स्वरूपसिंह हजारी हे धारूर नगर पालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. काल दुपारी 19 वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचं सांगितल्याने नेमकं प्रकरण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: