पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावे, शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको आंदोलन

0 241
 शेवगाव  –   राज्यात मागच्या महिन्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rains) खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे (Punchnama)  करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बालमटाकळी येथे शेवगाव- गेवराई (Shevgaon- Gevrai) राज्यमार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.  प्रशासनांकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन दोन तासांनी मागे घेण्यात आले.

शेवगाव तालुक्यात पूर्व भागातील बालमटाकळी -बोधेगाव परिसरात गेल्या दीड महिन्याभरात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे शेत जमिनीत वेळोवेळी पाणी साचल्याने शेतातील खरीप हंगामातील कापूस, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी, आदी उभी पिके सडून जाऊन शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे.  काहींच्या विहिरी ढासळल्या गेल्या आहेत तसेच  शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे, नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करून मराठवाड्याच्या धर्तीवर हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, इ-पीक पाहणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे .

कृति सेनॉनचा हॉट लुक पाहून फॅन्स म्हणतात ‘हाय मेरी परम सुंदरी’ 

शेवगाव -गेवराई राज्यमार्ग, बालमटाकळी- कांबी जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल जोरदार अतिवृष्टीमुळे पाण्याने वाहून गेले आहे तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे सदर खड्डे तातडीने दुरुस्ती करण्यात याव्यात अश्या प्रमुख मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या बोधेगाव चे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे, यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे अश्वासन दिले त्यानंतर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बडधे, मरकड, ढाकणे, गायकवाड यांनी चोक बंदोबस्त ठेवला यावेळी राज्यमार्गावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
Related Posts
1 of 1,640
या आंदोलनात बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, बप्पासाहेब पारनेरे, राजेंद्र ढमढेरे, उपसरपंच तुषार वैद्य, मोहनराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, नामदेव कसाळ, हरी फाटे,संजय वडते, हरीचंद्र घाडगे, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या वेळी बोधेगाव चे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे उशिरा आल्याने आंदोलक संतप्त होऊन अनेकांनी त्यांना मुख्यालयात येत नाहीत जनतेची अडचण होत असल्याने त्यांना धारेवर धरले गेले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: