दिलासा.. ! पेट्रोल-डिझेलनंतर खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण

0 364

नवी मुंबई –  नुकताच केंद्र सरकार (Central Government) ने पेट्रोल (Petrol) वर पाच रुपये आणि डिझेल(Diesel) वर प्रतिलिटर दहा रुपये कमी करून सर्वसामान्यांना थोडाफार महागाईतून दिलासा दिला आहे. तर आता पेट्रोल आणि डिझेल नंतर खाद्यतेलाच्या (Edible oil) किमतीती घसरण झाली आहे. कमी झालेल्या या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.  देशातील अनेक ठिकाणी  खाद्य तेलाच्या किंमतीत २०,१८,१०, ७ रुपयांपर्यतची घसरण झाली आहे. शेंगदाणा , पाम, सोयाबीन , सूर्यफूल आणि सर्वच प्रमुख खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.(Comfort ..! Decline in edible oil prices after petrol-diesel)

 भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कातील कपात ०४ नोव्हेंबर पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. उत्पादन शुल्कातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे.
सरकारने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे. एप्रिल-ऑक्टोबरमधील वापराच्या आकडेवारीवर आधारित, उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा  ८,७००   कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
Related Posts
1 of 1,608

खाद्य तेलाच्या किंमतीत किती घसरण?

पामतेलाचे (Palm oil) किंमतीत घसरण

महाराष्ट्र- ५ ते ७ रुपये प्रति लिटर

दिल्ली – ६ रुपये प्रति लिटर
अलीगढ- १८ रुपये प्रति लिटर
मेघालय – १० रुपये प्रति लिटर

खोबरेल तेलाच्या (Coconut Oil) किंमतीत घसरण-

दिल्ली – ७ रुपये प्रति लिटर
मध्यप्रदेश – १० रुपये प्रति लिटर
मेघालय – १० रुपये प्रति लिटर
तामिळनाडू- १० रुपये प्रति लिटर

सोया ऑइलच्या (Soybean Oil) भावात घसरण-

दिल्ली – ५ रुपये प्रति लिटर
लुधियाना आणि अलीगढ – ५ रुपये प्रति लिटर
छत्तीसगढ- ११ रुपये प्रति लिटर
महाराष्ट्र- ५ ते ७ रुपये प्रति लिटर(Comfort ..! Decline in edible oil prices after petrol-diesel)

हे पण पहा – किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: